माझ्या ब्लॉगवर आपलं स्वागत आहेIसुस्वागतम

जिल्हा परिषद शाळा शेलवली (बांगर) ता.शहापूर आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Friday, 31 March 2017


जिल्हा स्तरीय विविध गुण दर्शन  स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त देशभक्तीपर गीत 
https://youtu.be/h7LoD2WPilo 

Sunday, 9 August 2015

उपक्रम

'माझे नाव, माझे विशेषण ' शब्दांकन- हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर ,जिल्हा परिषद शाळा,शेलवली(बां.) बऱ्याचदा मुले एकमेकांना टोपण नावाने हाक मारत चिडवत असतात हीच गोष्ट लक्षात घेऊन परिपाठात मुलांना कल्पना देऊन प्रत्येक मुलाने आपल्या नावाला एक विशेषण लावून नाव सांगायच असं सांगीतलं .....पण एक अट घातली प्रत्येक मुलाने आपल्या नावाच्या पहिल्या अक्षराने सुरु होणारे विशेषण वापरायचे आणि शक्यतो स्वतःला लागू पडणारे विशेषण सांगायचे .मग काय.... सुरुवातीला जेव्हा हे मुलांना सांगीतलं तेव्हा मुलांना खूप गंमत वाटली...पण जेव्हा आपल्याच नावाने सुरु होणाऱ्या अक्षराने सुरु होणारे विशेषण सांगताना काही मुलांची भंबेरी उडालेली पाहुन इतर मुले त्यांना मदत करायला लागली काही मुले स्वतःचे विशेषण शोधण्याच्या विचारात गर्क झाली. ....या पुढची गंमत म्हणजे एखाद्या मुलाने स्वतःला स्वतःच लावलेले विशेषण जर त्या मुलाला किंवा मुलीला लागू पडत असल्यास मुले जोरदार टाळी वाजवून दाद देत होती ....एका विवेक नावाच्या मुलाने स्वतःचे विशेषण चक्क "विचित्र विवेक" असे सांगितले त्यालाही मुलांनी दाद दिली.एका मुलीने अभ्यासु अस विशेषण सांगितल्यावर सर्वानी तुझा तर घरचा अभ्यास अपूर्ण असतो असा एकच गलका करुन तू खर तर ,'आळशी' असे सांगायला हवे होते असा एकासुरात आवाज दिला...एक भरत नावाच्या मुलाने स्वतः ची ओळख चक्क "भांडखोर भरत "अशी केल्याबरोबर मुले खो खो हसत 'बरोबरच सांगतोय तो' अस म्हणाली .दिवसभर मुले त्यानी स्वतःला लावलेल्या विशेषणानी हाक मारत होती.अगदी खेळतानाही मुले गंमतीने त्याच नावाने हाक मारत होती.खेळता खेळता मुलांचा विशेषण हा भाग मात्र आंनद घेत नक्कीच पक्का झाल्याचं वेगळच समाधान आम्हा शिक्षकांना वाटत होतं.....जाताना मुलाना स्वतःच्याच नावापुढे इतर जास्तीत जास्त विशेषणे लावून आणण्याचा आनंददायी स्वाध्यायही देण्यात आला...दुसऱ्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांने 100 च्या वर विशेषणे लिहुन आणली.मोनिका नावाच्या मुलीने तर 557 विशेषणे लावून नाव लिहिण्याची किमया केली .विद्यार्थ्यांनी खूप मजा करुन या उपक्रमाचा आनंद लूटला.जास्तीत जास्त विशेषण लावून आणणाऱ्या 1ली ते 4 थी च्या व 5वी ते 7वी च्या विद्यार्थ्यांना बक्षीस देवून गौरविण्यात आले.

Saturday, 6 June 2015

janeev pratishtan

सामाजिक व सांस्कृतिक उद्दीष्टाने स्थापन झालेल्या जाणीव प्रतिष्टान तर्फे सालाबाद प्रमाणे याही वर्षी गरजू व हुशार शभर मुलांना शालेय वस्तू वाटप कार्यक्रम शहापूर जिल्हा ठाणे येथे रविवार दिनांक २१/६/२०१५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित केलेला आहे .